हजरत मुहम्मद पैगंबर जयंती ईद-ए-मिलादला यवत मध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते. मोहम्मद पैगंबर हे प्रेषित होते इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला त्यामुळे त्यांना नबी रसूल आदि नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानले जाते.
सर्वश्रेष्ठ अल्लाहने आदर्श जीवन म्हणून हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनाचा निर्देश केलेला आहे. पैगंबरांनी स्त्रीभ्रून हत्येला विरोध करून स्त्री जातीचा सन्मान केला. हजरत मोहम्मद पैगंबर यांना एका धर्मापुरता मर्यादित संदेश देण्यासाठी पाठवले नाही तर अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी व ईश्वराप्रती श्रद्धेची शिकवण देण्यासाठी पाठवले या वचनावरून इस्लामची महान विश्वबंधुता दिसून येते हजरत मोहम्मद पैगंबरांचा संदेश अखिल मानवजातीसाठी आहे. वर्ण वंश भाषा गरीब श्रीमंत काळा गोरा आदी प्रकारच्या भेदांना मूठमाती देऊन प्रत्येक मानवाला एका मानवाच्या रूपात संबोधित करतात सर्व मानव जात एक आहे अल्लासमोर सर्व समान आहेत सर्वांना हवा पाणी प्रकाश समान आहे मानवता हीच खरी इस्लामची जीवनपद्धती आहे. मानवाची सेवा हीच अल्लाची सर्वश्रेष्ठ सेवा होय अशा अनेक शिकवणी मोहम्मद पैगंबरांनी सर्व मानव जातीला दिलेल्या आहेत.
हजरत मुहम्मद पैगंबर जयंती ईद-ए-मिलादला यवत मध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण मिरवणुकीमध्ये सामील झालेले यावेळी दिसून आले. डीजे च्या तालावर इस्लामी ध्वजाबरोबर तिरंगा ध्वजही जोशात फिरवताना तरुण दंग झाले होते. यावेळी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हजरत बडे शहावाले बाबा दर्गा येथून संध्याकाळी 6:30 चे नमाज पठण करून जुलूस मिरवणुकीला सुरुवात झाली रात्री 8:30ला श्री काळभैरवनाथ मंदिर चौकात मिरवणुकीची सांगता झाली. यवत येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत बडे शहावली बाबा दर्गा येथे दसऱ्याच्या वेळी श्री काळभैरवनाथांची पालखी पूर्वीपासून वर्षानुवर्ष जात असते व तिथे (आपट्याची पाने )सोने लुटण्याचा कार्यक्रम होत असतो.
यावेळी मुस्लिम बांधवांच्यावतीने यवत मस्जिद ट्रस्टचे ट्रस्टी मुबारकभाई शेख यांच्या हस्ते यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम शांततेत व आनंदात साजरा करण्याचे सर्वांना आवाहन केले. मा. जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम,मा. पंचायत समिती सदस्य कुंडलिक खुटवाड, उपसरपंच सुभाष यादव यांनी मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.उपसंरपच विद्यमान ग्रा. सदस्य सदानंद दोरगे, विद्यमान ग्रा. सदस्य इमरान तांबोळी, ग्रा. सदस्य गौरव दोरगे ,मा. ग्रा. सदस्य साजिद सय्यद, उद्योजक संदीप दोरगे , विशाल भोसले, सुरज चोरगे, मयूर दोरगे, दीपक दोरगे, उपस्थित होते.
तर यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने व्यापारी लोकांना व उपस्थित ग्रामस्थांना सर्वांसाठी सरबत वाटप ठेवण्यात आले होते. यावेळी यवत मुस्लिम समाजाच्या वतीने उपस्थित सर्व समाज बांधवांचे ग्रामस्थांचे समीर भाई सय्यद यांनी आभार मानले. यावेळी कमुभाई तांबोळी, शेरू उद्योग समूहाचे इलाहीभाई शेख, समीरभाई सय्यद, मेहबूब भाई तांबोळी, रौफभाई सय्यद ,मुन्नाभाई तांबोळी, मोहसीन तांबोळी, हरून पठाण व मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण व यवत ग्रामस्थ उपस्थित होते उत्साहात व शांतते कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी यवत पोलीस स्टेशन यांच्याकडून चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस नाईक विजय आवळे ,पोलीस कॉन्स्टेबल सुजित जगताप ,सागर शिरसागर ,किरण तुपे व दीपक यादव बंदोबस्तासाठी उपस्थित होते.