जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची बदली मुंबईवरुन एच. पी. तुम्मोड येणार
बुलढाणा
बुलडाणा जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांची आज एका आदेशान्वये बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबईवरुन दुग्धव्यवसाय आयुक्त एच.सी. तुम्मोड जिल्हाधिकारी म्हणून येत आहे. याबाबत अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आदेश जारी केला. कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये रामामुर्ती यांचा समावेश होता. राजकीय, सामाजिक गटतट सांभाळून घेतल्याने रामामुर्ती यांची जिल्ह्यातील कारकिर्द सॉलीड राहीली.
जिल्हाधिकारी एस.रामामुर्ती यांना जिल्ह्यात येवून २ वर्ष एक महिना असा कालावधी झाला आहे. तत्पुर्वीच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या काळात कोवीडचे आगमन झाले होते. मात्र त्यांच्या कार्यशैलीवर राजकीय क्षेत्रातूनच प्रश्न उपस्थित केले गेल्याने त्यांची कारकिर्द वादग्रस्त ठरली. त्यांच्यानंतर आलेले रामामुर्ती यांच्यावेळी कोवीडने उच्चांक गाठला होता. यावेळी काम करणे आव्हानात्मक होते. मात्र राममुर्ती यांनी हे आव्हान पेलले. दरम्यान ऑक्सीजन सारख्या महत्वाच्या सुविधा उपलब्ध करण्यामध्ये त्यांनी विशेष परिश्रम घेतले. राजकीय क्षेत्रालाही त्यांनी व्यवस्थीत सांभाळून घेतल्याने व वागण्या बोलण्यातील सामान्यपणामुळे रामामुर्ती यांची कारकिर्द सर्वसमावेशक राहीली. ते तामिळनाडू केडरचे अधिकारी होते. त्यांच्या जागी मुंबई येथून एच. पी. तुम्मेड हे नवे जिल्हाधिकारी म्हणून येत आहे. अपर मुख्य सचिवांनी आज बदली आदेश काढला आहे.
Attachments area