श्री शिवाजी महाविद्यालयातील युवा संवाद कार्यक्रमात श्री. विशाल नरवाडे,भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
स्थानिक चिखली येथील श्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 14 आॅक्टोबर 2022 रोजी करण्यात आले होते.गणराज्य फाऊंडेशन चिखली व श्री शिवाजी महाविद्यालय चिखली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सावळी येथील युवा आय पी एस अधिकारी श्री विशाल नरवाडे यांनी युवा संवाद उज्वल करिअर साठी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सामान्य कुटुंब, ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण अशा संघर्षमय परिस्थितीवर मात करुन स्वतः प्राप्त केलेल्या यशाचे उदाहरण सांगुन विशाल नरवाडे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल करीअर साठी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.केंन्दीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील विविध टप्पे... अभ्यास पद्धती...विषयांची निवड.. मुख्य परीक्षेची तयारी..मुलाखतीतील बारकावे..अभ्यासातील चिकाटी व सातत्याचीआवश्यकता या बाबतीत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी मोबाईल.. व्हाटस् अॅप.. फेसबुक.. इन्स्टाग्राम या सोशल मिडीयाचा वापर विवेक बुद्धीने करावा तसेच या माध्यमांवर अभ्यासा शिवाय वेळ घालवू नये असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी केले. अभ्यासाव्यतीरीक्त समाज माध्यमावरील वेळ हा विद्यार्थी जिवनात साईलेंट किलर ठरतो यात आपला बहुमूल्य वेळ कसा वाया जातो हे दुर्दैवाने युवकांच्या लक्षात येत नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमराज देशमुख हे होते.. यावेळी विशाल नरवाडे यांना आपला आदर्श मानुन त्यांच्या यशातुन विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ ओमराज देशमुख यांनी केले.या प्रसंगी गणराज्य फाउंडेशनचे उपाधक्ष श्री.विष्णू आव्हाळे व रामेश्वर वसु,महिला व बालकल्याण अधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ जे जे जाधव यांनी केले. सुत्रसंचलन गायत्री देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन नॅक समन्वयक प्रा डॉ वनिता पोची यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विद्यार्थी करीअर कट्टा चे समन्वयक प्रा डॉ एस आर पाटील.. राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा स्वप्नील काळे.. राजेंद्र करपे .. गणराज्य फाऊंडेशनचे विष्णू आव्हाळे , विद्यार्थी यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमांसाठी सावळी येथील प्रविण वाघ,धाड येथील आकाश गुजर व अनेक प्रतिष्ठित नागरिक.. महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी उपस्थित होते..