शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी निर्दोष मुक्तता
मलकापूर प्रतिनिधी
प्रकरणाची हकीकत अशी आहे की ग्रामसेविका मनीषा जामुंदे हिणे पोलीस स्टेशन बोरखेडी येथे दिनांक 5-04- 2017 रोजी फिर्याद दिली होती की मौजे टाकळी वाघजाळ तालुका मोताळा येथील संदीप वसंत शिराळ याने तिचे कार्यालयात जाऊन माझे वडिलांचे विहिरीचा प्रस्ताव का पाठविला नाही असे म्हणून अंगावर धावून जाऊन खुर्ची उचलून फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सुपडा दलपत लांडे मध्यस्थी मारून करन मध्ये आल्यामुळे तिचा बचाव झाला.
अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 83/17 भा.द.वि.चे कलम 353, 186,427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरण नंतर मलकापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते सत्र खटला क्र.83/2019 असा होता. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऐकून सात साक्षीदार तपासण्यात आले होते सर्व प्रकरणात सरकारी पक्षाचा व आरोपीतर्फे अधिवक्ता जी डी पाटील ,मलकापूर यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून मलकापूर येथील तदार्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब श्री एस व्ही जाधव यांनी सर्व प्रकरणातून आरोपीची सबळ पुरावे अभावी केले निर्दोष मुक्तता केली.