Breaking News
recent

केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिरात झालेल्या परीक्षेत के.के.शेगोकार राज्यातुन तिसरे

नांदुरा प्रतिनिधी

भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने चैत्यभूमी मुंबई येथे दि.२३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर पर्यंत दहा दिवसीय श्रामनेर,बौद्धाचार्य ,केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक  परीक्षेत के.के. शेगोकार बुलडाणा जिल्हा कोषाध्यक्ष यांनी यांनी ८४ टक्के गुण प्राप्त करून राज्यातुन तिसरा क्रमांक प्राप्त केला.

तसेच बौद्धाचार्य परीक्षेत जिल्हा सरचिटणीस बी.के.हिवराळे व नांदुरा तालुका अध्यक्ष दिलीप मेढे यांनी राज्यातुन अनुक्रमे  दुसरा,तिसरा क्रमांक प्राप्त केला.राष्ट्रीय कार्यकारिणीचे ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई, संस्कार विभागाचे प्रमुख अॅड. एस. एस.वानखडे यांच्या हस्ते  यशस्वी शिबिरार्थ्यांना प्रशस्तीपत्र,पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला. 

विनेश इंगळे, डी.एन खंडारे,राजेश पहुरकर यांनी या परीक्षेत सुयश मीळविले. बुलडाणा जिल्ह्यातुन सहभागी झालेल्या व सुयश मीळविले त्याबद्दल  भारतीय बौध्द महासभा बुलडाणा उत्तर शाखेचे जिल्हा अध्यक्ष एस.एस.वले यांनी सर्व शिबिरार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Powered by Blogger.