Breaking News
recent

दिंडी सोहळ्याच्या गजरात महर्षी वाल्मिकी जयंती संपन्न



मलकापुर प्रतिनिधी

    दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा  आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्सव समिती,मलकापूर व ह भ प विष्णू बावस्कार महाराज यांच्या संयुक्त विद्यमाने रामायणकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .सर्वप्रथम मलकापूर मधील पंचमुखी हनुमान मंदिर येथे महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन ह. भ. प. नितीन महाराज, ह भ प विष्णू बावस्कार महाराज , इंजी. सुरेश तायडे , भिकाभाऊ कठोरकर व उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले. 

  ह भ प पांडुरंग महाराज, शालिग्राम महाराज, मंगेश महाराज , छोटू महाराज, शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज , विक्रम महाराज, संजुभाऊ धाडे महाराज, नयन महाराज, गजानन महाराज, तुकाराम महाराज यांच्या नेतृत्वात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध , वाल्मीकींच्या नामगजरात तसेच बजरंगी गृप, मुक्ताबाई गृपच्या सदस्यांनी सुंदर पावली खेळत मलकापूरकरांचे मॅन वेधून घेतले . तसेच पुनमताई बावस्कर , साहेबराव सपकाळ महाराज, वैभव महाराज , वैष्णवीताई, संजय पाटील, स्वप्नील धाडे , शुभम घुले , सौ गीताबाई कठोरकर यांचे अमोल सहकार्य मिळाले.

     दिंडी सोहळ्या दरम्यान आमदार राजुभाऊ एकडे, ऍड हरीश रावळ , संतोषभाऊ रायपूरे, माजी आमदार चैनसुख संचेती,  माजी नगरसेविका  मंगलाताई पाटील,बंडूभाऊ चौधरी , संजय काजळे मोहनजी शर्मा बंडूभाऊ चवरे , कुणालभाई वानखेडे, आर आर पाटील सर आदि मान्यवरानी महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेचे पूजन केले . कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवराय मंगल कार्यालय या ठिकाणी ॲड साहेबराव मोरे गजानन ठोसर ,गणेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ह भ प नितीन महाराज व ॲड. साहेबराव मोरे , प्रकाश बावस्कार यांनी महर्षी वाल्मिकींच्या  जीवन चरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकला . या कार्यक्रमासाठी मलकापूर तालुक्यातील वाल्मिक भक्तगण व आदिवासी कोळी महादेव जमातीचे बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.जी. इंगळे सर तर आभार प्रदर्शन डी . एस . सपकाळ सर यांनी केले महर्षींच्या सामुहिक आरतीने व प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Powered by Blogger.