जातीय सलोखा अभियानांतर्गत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
आडगाव बु प्रतिनिधी
अडगाव बु पोलिस स्टेशन हिवरखेड व अडगाव बु शिवाजी नगरच्या समस्त गावकऱ्यांचे वतीने स्थानिक बालाजी मंगल कार्यालयात दिनांक 2 ऑक्टोबर ला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.जातीय सलोखा अभियानांतर्गत हिवरखेड पोलिस स्टेशन च्या वतीने समाविष्ट गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहेत यात गावागावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जातीय सलोखा दृढ व्हावा म्हणून नेहमी प्रयत्न केल्या जातात त्यातीलच एक उपक्रम म्हणून नवरात्र उत्सव, ईद ए मिलादुन्नबी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी नवीन बालाजी मंगल कार्यालयात सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे जातीय सलोखा अभियानांतर्गत आयोजित रक्तदान शिबीरात तमाम नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून या सामाजिक उपक्रमाला भव्य स्वरूपात यशस्वी करावे असे आवाहन आयोजक अडगाव बु शिवाजी नगर नागरिक व हिवरखेड ठाणेदार ठाणेदार विजय चव्हाण यांनी केले आहे