Breaking News
recent

काटी येथे लम्पीने घेतला चार जनावरांचा बळी



नांदुरा प्रतिनिधी

नांदुरा तालुक्या मध्ये लम्पी आजाराने एक महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. तालुक्यातील जनावरांना लम्पी आजाराची लागण झाल्यामुळे मृत्यू  होत. असल्याने पशुपालन चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लम्पी मुळे दुधाच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे दुग्ध व्यवसाय सुध्दा अडचणी आला आहे.

       त्याचप्रमाणे ग्राम काटी येथे लम्पी आजाराची लागन ८० ते १०० जनावरांना झाली आहे.दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी चार जनावरांचा मृत्यू झाला आहे. सचिन रामराव जंगले, राजेंद्र काशिराम तोगले यांच्या गोऱ्हयाचा मृत्यू झाला तर डिंगाबर मधुकर हिवाळे,भिमराव गुलाबराव जंगले,यांच्या संकरीत जर्सी गाई चा मृत्यू झाला. दुधाळ जनावरांचा मृत्यू  झाल्यामुळे पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.डी. बी.राठोड यांनी घटनास्थळी जावून मेलेल्या जणावरांचा पंचनामा करून लम्पी आजाराने जणावरांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.लम्पी आजारा मुळे पशुपालकान मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. लम्पी आजारा पासुन जनावरांना दुरूस्त करण्यासाठी पशुपालक खाजगी दवाखाना व आयुर्वेदिक औषधी उपचार करत आहे. लम्पी आजार झालेली जनावरे इलाज केल्याने दुरुस्त होत आहे. पशुपालकांनी घाबरुन नये असे आवाहन डाॅ. राठोड यांनी काटी येथे केले आहे.

         लम्पी आजार झालेल्या जणावरांच्या उपचारासाठी व मृत्यू झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना शासनस्तरावरून नुकसान भरपाई देण्याची मागणी पशुपालकांन कडून होत आहे.

Powered by Blogger.