ट्रॅक्टर ट्रॉली चोरणार्या चोरला केले गजाआड, सोनाळा पोलिसांची कारवाई
मतिन शेख, प्रतिनिधी संग्रामपुर :
संग्रामपुर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दित राहणार्या प्रतिक राजाराम गावंडे यांच्या मालकिचे ट्रॅक्टर व ट्रॉली यावर्षी २६ जानेवारी रोजी पिंगळीबेस वरुन चोरीला गेले होते. अशी फिर्याद सोनाळा पो.स्टेशनला देण्यात आली होती. त्या फिर्यादी वरुन सोनाळा पोलिसांनी ट्रॅक्टर व ट्रॉली शोधण्यास सुरुवात केली. तपास सुरु असतांना दिनांक १२-०३-२२ रोजी पो. स्टेशन दहीहांडा जि.अकोला येथुन गांधीग्राम येथील पुर्णा नदिच्या पात्रात एक बेवारस ट्रॅक्टर पाण्याखाली मिळून आला.
व तो ट्रॅक्टर सोनाळ्या गावातिल चोरीचा आहे हे निष्पन्न झाले. परंतु ट्रॉलीचा काही पत्ता लागला नाही. बरेच महिने गेल्यावर सोनाळा पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वारखेड ला जाऊन ट्रॉलीची पाहणी केली व ट्रॉली नंबर,चेचिस नंबर ची तपासनी केली. तपास पुर्ण झाल्यावर ट्रॉली चोरीची आहे हे स्पष्ट झाले. व त्यांनी ट्रॉली व आरोपी राधेश्याम केशव म्हसाये वय (३०) वर्ष राहणार वारखेड तालुका तेल्हारा जि.अकोला याला ताब्यात घेतले व आरोपी विरुद्ध कलम ३७९ भां.द.वी.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास सोनाळा पोलिस स्टे.चे उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे.