मौजे वाघुड येथे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर प्रवासी निवारा बांधावा.-वंचित बहुजन आघाडी ची मागणी
मलकापूर प्रतिनिधी धर्मेशसिंह राजपूत
मलकापूर ते नांदुरा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६वर असणाऱ्या ग्राम वाघुड येथील महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणचा प्रवासी निवारा तोडण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रवाश्यांना आवागमन करण्यासाठी महामार्गावर उघड्यामधे बसची प्रतिक्षा करत उभे रहावे लागत आहे. येथील बरेचसे विद्यार्थीही शहरामध्ये शिक्षणासाठी जात असतात त्यांना ही उन पावसात महामार्ग वर तात्काळ उभे राहावे लागत आहे.
म्हणून बहूजन वंचित आघाडीचे मलकापूर तालुका उपाध्यक्ष विलास पंढरी तायडे यांनी विद्यमान उपविभागीय अधिकारी महसुल यांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या तीन वर्षापासून होणाऱ्या या गैरसोयीबद्दल संबंधित विभागाने येत्या दहा दिवसांत कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल तसेच वेळ पडल्यास उपोषण ही करण्यात येईल. व याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घेण्यात यावी.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे यशवंत कळासे जिल्हा उपाध्यक्ष भाऊराव उमाळे जिल्हा संघटक जनार्दन इंगळे ब्राह्मणे जाफरखान अनिल तायडे रमेश इंगळे नरसिंग चव्हाण मधुकर इंगळे विश्वास मोरे नारायण जाधव एडवोकेट स्नेहल तायडे