धनगर समाज मागण्यासंदर्भात वनमंत्र्यांच्या दालनात बैठक
बुलढाणा प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विविध मागण्या संदर्भात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबई येथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात बैठक पार पडली. ही बैठक १९ ऑक्टोबर रोजी झाली. यावेळी मतदार संघातील धनगर समाज बांधवांच्या विविध मागण्या वनमंत्री मुनगंटीवार यांच्या समोर मांडण्यात आल्या. यात धनगर समाजास चराई क्षेत्र उपलब्ध करून देणे, तसेच चराई क्षेत्राच्या पासेस उपलब्ध करून देणे, वन क्षेत्रात भटकंती करण्यासाठी पासेस उपलब्ध करून देणे आदी विषय मांडण्यात आले.
` या विषयावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. त्यानंतर आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी समाजास आश्वासन दिले की, येत्या २० दिवसात पुन्हा वनमंत्री यांचेसोबत तातडीची बैठक घेऊन सर्व मागण्या पूर्ण करून घेऊ आणि धनगर समाज बांधवाना सर्वोतोपरी मदत शासनाच्या माध्यमातून मिळवून देऊ. यावेळी बैठकीत आ.गोपीचंद पडळकर, नंदु लवंगे, नितीन राजपुत आदी उपस्थित होते.