महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रोजगार सेवकाचे तीन दिवसीय प्रशिक्षणाची सांगता
दुधगाव येथे मलकापूर ग्रामपंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्राम रोजगार सेवक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन तहसीलदार सुरळकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाचे प्रमुख मार्गदर्शक पंचायत समिती मलकापूरचे गटविकास अधिकारी श्री होळकर साहेब यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रशिक्षण म्हणून श्री गौरव घोडके सहाय्यक कार्यक्रम अधिकारी खामगाव निलेश अवकाळे सहकार अधिकारी जळगाव जामोद यांच्यासह श्री शैलेंद्र पाटील श्री आळे साहेब शैलेश गाढवे साहेब उचाळे मॅडम आदींची उपस्थिती होती.
सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून खोडके सर कडून प्रशिक्षणाची सुरुवात करण्यात आली सदर प्रशिक्षणास गटविकास अधिकारी पंचायत समिती मलकापूर चे होळकर साहेब यांनी प्रशिक्षण निर्माण भेट देऊन पाहणी केली यावेळी अवकाळे साहेब यांनी उपस्थित रोजगार सेवक यांचा परिचय करून घेतला सदर प्रशिक्षणाच्या वेळेनुसार सुरुवात केली यावेळी लेबर बजेट आणि समृद्धी बजेट मधील फरक सांगून दशवार्षिक नियोजन आखाडा तयार करण्यासाठी मुद्द्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली. यावेळी कुमार पाडा या गावाची यशोगाथा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली यामध्ये कुटुंब सर्वेक्षण शिवार खेरेगाव फेरी कार्यक्रमाचे आयोजन करून कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले.
मनरेगा ही गावातील शेवटच्या घटकांपर्यंत कशी पोहोचवता येईल यासाठी रोजगार सेवकांची भूमिका काय असली पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले सदर योजनेअंतर्गत कोणकोणती कामे आपण आपल्या गावात घेऊ शकतो याची सुद्धा माहिती श्रावणी दिली रोजगार सेवक यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या कोणत्या आहेत याची जाणीव करून दिली समृद्धी बजेटच्या माध्यमातून गावाच्या विकासात कशी भर घालता येईल यावर प्रकाश टाकला सदर प्रशिक्षणास तालुक्यातील रोजगार सेवक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रशिक्षणाची शान वाढवली याबद्दल गाढवे साहेब यांनी रोजगार सेवक यांचे आभार मानले.
यावेळी प्रशिक्षणाच्या समारोपाचे रोजगार सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष गौतम झणके राजेंद्र जनके शामराव हिवाळे मनोज सातव सोळंके भाऊ विनोद इंगळे परिणाम सोनवणे गजानन वाघ आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल खोडके साहेब सौ ऊचाळे मॅडम गाढवे साहेब अवकाळी साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी अशोक भरकडे प्रभाकर इंगळे बळीराम सोनवणे गौतम झनके काळे सोळंके सर्व रोजगार सेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले