दोघा तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद भावाच्या पोटात सुरा खुपसून खून
प्रमोद हिवराळे जिल्हा प्रतिनिधी
चुलत भावांमध्ये झालेल्या वादातून हाणामारीदरम्यान धारदार सुरा पोटात, बरगड्यात खूपसून आला. एकाचा खून करण्यात मलकापूर तालुक्यातील भालेगावात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली दरम्यान मारेकरी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती आहे. भालेगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील परिसरात प्रदीप पद्माकर वानखेडे (३४), अशांत उर्फ कडू अशोक वानखेडे ( २८ ) या नात्याने चुलत भाऊ असलेल्या दोघा तरुणांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत अशांत उर्फ कडू याने लोखंडी सुऱ्याने प्रदीप वानखेडे याच्या पोटात व बरगड्यांवर लोखंडी सुऱ्याने सपासप वार केले. त्यामुळे प्रदीप वानखेडे उपचारासाठी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी धाव घेतली. गंभीर जखमीला मलकापूर येथे हलविण्यात आले. प्रथम खासगी त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी गंभीर जखमीला मृत घोषित करण्यात आले. भालेगावातील ग्रामस्थांनी दवाखान्यात एकच गर्दी केली.
घटना घडल्यानंतर मारेकरी अशोक ( कडू ) वानखेडे स्वतः पोलिसात जमा झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले, तर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भालेगांवा तील खून. मलकापूर पोलीसांनी वानखेडे यांच्या उर्फ कडु अशोक याच्याविरुध्द कलम ३०२,५०४ प्रकरणी पद्माकर नामदेव फिर्यादीवरून अशांत अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आज शुक्रवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश दिले. असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांनी दिली आहे.