सामाजिक कार्यकर्ते विनोद दगडू झनके याच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर:ग्रा धरणगाव येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद दगडू झनके यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे जेष्ठ चिरंजीव करण विनोद झनके पत्रकार यांनी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले.
गर्भवती महिलांना सकस आहार व आंतरबाह्य रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच रेल्वे स्टेशन व बस स्टँड वरील निराधार व दुर्बल लोकांना देखील फळ वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा नेते भीमराज इंगळे. संविधान प्रचारक व प्रसारक अमर कुमार तायडे .बहुजन समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे .शुभम सावळे .ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मलकापूर तालुका अध्यक्ष सागर मेश्राम. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.