शासनाचे पंचनाम्याचे आदेश म्हणजे शेतकऱ्यांनच्या जखमेवर मिट चोळण्या सारखे. : गोपाल तायडे
शेगाव तालुक्यात मोठया प्रमाणात अतिरुष्टी होऊन सुद्धा अजून पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. यंदाची दिवाळी अंधारात जाईल असे चित्र आहे. पाऊस थामण्यांचे नाव घेत नाही. आणि परतीच्या पावसाने नुसता थेमान घातला आहे. होत नव्हतं ते सर्व पावसा मध्ये वाहून गेल आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे हेरावून नेला आहे. यातच भरात भर म्हणून प्रशासनाने पंचनाम्याच्या थोटांग मांडून शेतकऱ्यांच्या जखमे वर मिट चोळण्या काम केले.आहे शेगाव, संग्रापूर. तालुक्यात मोठया प्रमाणात पाऊस पळून ढग फुटी सदृश्य परिस्थिती होती. त्यामुळे शासनाला झोपेतून जागे करण्या करीता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष मा. प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वा मध्ये. शेगाव तहसील कार्यालयावर आसूळ मोर्चा, तसेच संग्रापूर तहसील कार्यालयावर वर्ती दखल मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चा ची नोद शासन दरबारी असेलंच शेतकऱ्यांचा एवढा आक्रोश अस्ताना देखील कोणताही राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही त्या मुळे शेतकऱ्यांनी संघटित होऊन या मोर्चात मोठया संख्येने आपला सहभाग नोंदविला होता. उभ्या शेतामधील पीके पाण्या खाली गेले अस्ताना पंचनाम्या मध्ये वेळ घालवता कशाला अश्या तऱ्हेची भावना शेतकरी बोलून दाखवीत आहेत. पंचनाम्याचे थोटांग बंद करून तसरसकट 50 हजार नुकसान भरापाई द्या , तसेच विना अट पिक-विमा मंजुर करा तेव्हाच शेतकऱ्यांची दिवाळी गोळ होणार होईल. अशी भावना स्वाभिमाणी शेतकरी संघटनेचे शेगावं शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी बोलून दाखवली.