सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या एल्गार मोर्चाला शेतकरी सेनेचा जाहीर पाठिंबा
मा.रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली 6 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एल्गार मोर्चासाठी |
पक्षाचे झेंडे बाजुला ठेवु,शेतकरी म्हणून एकत्र येऊ..! परतीच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे चिखली तालुक्यातील अनेक गावातील सोयाबीन,कापूस,तूर,मका,आदि पिकांसह भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तर दुसरीकडे प्रशासन मात्र नुकसान नसल्याचे सांगुन पंचनामे करण्यास टाळाटाळ करीत आहे.पिक विमा नुकसानीचे अर्ज ७२तासाच्या आत केले परंतु १५दिवस उलटुनही कंपनीच्या मनमानी कारभारामुळे अजुनही पंचनामे झालेले नाहीत.यासाठी नुकसानग्रस्त शेतक-यांना शेतीपिकांचे नियम अटि न लावता पंचनामे करून तात्काळ १००% मोबदला देण्यात यावा,नियम अटिचा फार्स न घालता चिखली तालुक्यातील शेतक-यांना पिक विमा देण्यात यावा,सोयाबीन- कापसाला भाव मिळावा अशा अनेक मागण्या त्या मध्ये आहे .