कमी पटसंख्या शाळा बंदचा निर्णय रद्द करा; गोरसेना संघटने ची मागणी
मोताळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील वाडी-वस्ती, तांडा, साखरशाळा, खडी केंद्र, तसेच दुर्गम भागातील 0 ते 20 पटापर्यंतच्या शाळा बंद करण्याबाबतचे शासन परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी गोर सेना संघटनेचे गोरसेना विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सागर राठोड तालुका अध्यक्ष आकाश राठोड, गोरसेना तालुका सचिव कुणाल चहाण गोर सेना विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष सौरभ चव्हाण, तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे. गोरसेना तालुका संघटनेचे अध्यक्ष आकाश राठोड यांनी सांगितले की, राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दि. 21 सप्टेंबर रोजी राज्याच्या ग्रामीण भागातील 0 ते 20 पटाच्या शाळा बंद करण्याबाबतची कार्यवाही कुठपर्यंत आली असा आढावा घेणारे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार राज्यात ठिकठिकाणी माहिती घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.
ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या 2.5 टक्के खर्च होतो, तो वाढवण्याची आवश्यकता आहे. राज्यात शिक्षकांची 67 हजार 755 पदे रिक्त आहेत. ती त्वरित भरावीत,त्याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी रिक्त पदे भरल्यास राज्य सरकारवर आर्थिक भार पडेल हे कारण पुढे करून नवीन भरती करण्याऐवजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेणे दुर्दैवी आहे. या निर्णयाविरोधात पालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असल्याचे गोर सेना सामाजीक संघटने कडून सांगण्यात आले.