विजयादशमी दिनी AHP/राष्ट्रीय बजरंग दल कडून जिल्हाभरात ठिकठिकाणी शस्त्रपूजन कार्यक्रम.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल कडून हर घर शस्त्रपूजन हा उपक्रम राबवत प्रवीण भाई तोगडियाजी यांच्या आदेशाने विजयादशमीच्या निमित्त भारतभर शस्त्रपूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आले विदर्भासहित बुलढाणा जिल्ह्यात, एकूण 30 गावांमध्ये सामूहिक शस्त्रपूजा करण्यात आली, राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष जीवनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात शस्त्रपूजन कार्यक्रम करण्यात आले, मंडळांना भेट देऊन त्या ठिकाणी शस्त्रांचे पूजा करण्यात आली. वीर हिंदू विजेता हिंदू नाऱ्यांचा आवाज दुमदुमला विजयादशमीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शस्त्र पूजन कार्यक्रम संपन्न झाला.