Breaking News
recent

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ.रवि राणा यांचा फोटो असलेल्या बॅनरला चपलांचा हार घालून जोडे मारा आंदोलन

 

मलकापूर प्रतिनिधी

  प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, दिव्यांग हृदयसम्राट आ.बच्चूभाऊ कडू यांच्याबद्दल आ.रवि राणा यांनी बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी स्थानिक प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात रवि राणा यांचा फोटो असलेल्या बॅनरला जोडे मारो आंदोलन करीत त्यांचा निषेध केला.

आ.रवि राणा यांनी केलेल्या वक्तव्याचा तसेच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आ.बच्चूभाऊ कडू यांच्या बद्दल चुकीचे व कोणताही आधार नसलेले खोटे आरोप करीत गरळ ओकून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. आ.राणा यांनी केलेले आरोप धदांत खोटे व बिनबुडाचे असून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व आरोपांचा निषेध करण्यासाठी आज २८ ऑक्टोबर रोजी स्थानिक तहसील चौक येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आ.रवि राणा यांचा फोटो असलेल्या बॅनरला चपलांचा हार घालून जोडे मारा आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांचेसह प्रहार अपंग क्रांती तालुका प्रमुख राहुल तायडे, महिला तालुका प्रमुख शुभांगी डवले, बलराम बावस्कर, उमेश जाधव, अमोल पाटील, शिवाजी भगत, शितल जांगडे, संजय इंगळे, शालीकराम पाटील, विजय पाथरकर यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Powered by Blogger.