शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने मलकापुर येथे शनिवार रोजी मशाल यात्रेचे आयोजन !!
मलकापुर:- शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने दि.29 ऑक्टोबर शनिवार रोजी मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी आज स्थानिक विश्रामगृहावर आयोजित बैठकीत दिली.या बैठकीला युवा सेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, युवा शहर प्रमुख पवन गरुड, शेख समद कुरेशी, प्रा. कृष्णा मेहसरे, ज्ञानेश्वर निकम ( माऊली), रामभाऊ थोरबोले, रामराव तळेकर, प्रसाद पाटील, शिवम ढोले, सागर भोजने, सचिन निळे, बाळू पोलाखरे, सुरेश फरफट, अभिजीत भोंबे, मयूर ताटक्ष,सै.वसीम सै रहीम, जल्लोद्दिन चव्हाण,ईमामशाह,ऐजाज शेख,नासीरभाई सह आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत मा. पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराचा प्रसार करण्याकरिता मलकापूर येथे बस्थानकापासून मशाल यात्रेचे आयोजन शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, युवासेना जिल्हाधिकारी शुभम पाटील, जिल्हा उपप्रमुख संजय सिंह जाधव, युवा सेना उपजिल्हाधिकारी रवींद्र भोजने, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि.29 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वा मलकापूर बस स्थानक येथे हजर राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहरप्रमुख गजानन ठोसर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.