Breaking News
recent

सामान्य माणसाची पत वाढवण्याचे काम जिजाऊ महिला अर्बन करत आहे.माजी आमदार डॉ.खेडेकर



प्रतिनिधी/भरत जोगदंडे

माँ जिजाऊ महिला अर्बन मातृतीर्थ सिंदखेड राजा यांच्या वतीने महिला बचत गट यांना प्रत्येकी ३ लाख एकूण ९ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले सोबतच पहिले वाहन कर्ज मारुती बलेनो कार वाटप करण्यात आले मा.रामेश्वर ढघे रा.धानोरा यांना कार दिली .या वेळी ते व्यासपीठावरून मार्गदर्शन करतांना बोलत होते .

बचत गट कार्यशाळेचे अध्यक्ष माजी आमदार कायंदे साहेब हे होते.तर प्रमुख उपस्थित प्रा.प्रज्ञा नरेंद्र लांजेवार,डॉ.संजय घुगे,संतोष ठाकरे,योगेश जाधव,प्रा.लताताई राजपूत,माँ जिजाऊ अर्बन च्या अध्यक्षा प्रा.मंदाकिनी बंगाळे,मुख्य कार्यकारी अधिकारी अँड.निलकुमार बंगाले हे होते . कार्यक्रमाची सुर्वात माँ  जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.व विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले प्रा.लांजेवार यांनी जिजाऊ अर्बन करीत असलेल्या सामाजिक कार्याचा वसा व वारसा जगा समोर ठेवण्याचे काम करीत आहे ,सोबत कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा.मंदाकिनी विमल यांनी संस्थेचे कार्य व योजनाची माहिती दिली.तसेच संस्था राबवित असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले संतोष ठाकरे यांनी बँक व व्यक्ती यांच्या विषयी हमी फक्त LIC देऊ शकते.सोबत आरोग्याची काळजी घेण्याचे काम करते .

संस्थेच्या वतीने जिजाऊ बचत गट,सावित्री बचत गट, फातेमा शेख बचत गट यांना कर्ज वाटप करण्यात आले.सामजिक शेत्रात काम करण्याऱ्या मान्यवर मधे मा.अशोक काकडे दिव्य सेवा प्रकल्प बुलडाणा ,सर्पमित्र मा.वनिता बोराडे मेहकर डॉ.अलका गोडे देऊळगावमही,गीता नायर,अनिता खरात देऊळगाव राजा मा.वरद जोशी बालयोगी जालना प्रा.रामदास ओहर दे राजा दत्ता भोसले मातृतीर्थ फाऊंडेशन सिंदखेडराजा,आदित्य शिंदे,आराध्य सुरूषे,जोहराबानो शेख जिलानी,दिलशाद शेख ईलाही,सुमन गणेश तायडे,अनिता संजय आढाव,शोभा श्रीकृष्ण बंगाले,विमल मधुकर शेळके यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .

तसेच अनाथ व अपंग मुलांना शालेय साहित्य कपडे मिठाई,शिष्यवृत्ती देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.श्रीमंत निकाळजे यांनी केले आभार प्रा.भास्कर शिंदे उपस्थित सरपंच दिपक पवार,त्रंबक चित्ते सर,मधुकर शेळके सर डॉ मेरत प्रा.सुधीर शेळके मा.प्रदीप शेळके,प्रा.रफीख शेख,अतिष मेहेत्रे प्रा.क्रांती मेरत,शारदाताई खरात,रामेश्वर उगले,शाखाधिकारी,उर्मिला चव्हाण,पूर्णिमा कृष्णा चव्हाण,मयुरी कदम शेख अमीर बाबासाहेब बनसोडे  या साठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले .

Powered by Blogger.