Breaking News
recent

तहसील व पुरवठा अधिकाऱ्यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे गोरगरीबांची दिवाळी अंधारात...ऐंशी टक्के लाभार्थी आनंदाच्या शिधा वाटपापासुन वंचीत


मलकापूर:-  महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करून आनंदाचा शिधा  उपलब्ध करून देण्याची घोषणा केली यामध्ये चार वस्तू शंभर रुपयात रेशन कार्ड धारकांना दिवाळीनिमित्त देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला मात्र 80 टक्के लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिल्याने त्यांची दिवाळी अंधारातच उपाशीपोटी गेली उर्वरित लाभार्थ्यांना शासनाने त्वरित आनंदाचा शिधा वाटप करावा या संदर्भात मलकापूर शहर व तालुका शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी च्या वतीने तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन ठोसर यांचे नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

शासनाने व अधिकाऱ्यांनी फोटो पेपरामध्ये देऊन प्रसिद्धी तर करून घेतली परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही शहानिशा न करता गोदामा मध्ये उपलब्धता किती आहे आणि वाटप कसं करायचं याचा नियोजन न करता फक्त फोटो काढले. याबाबत रेशन दुकानदारांना व कार्डधारकांचा त्रास सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी रेशन दुकानदारां सोबत कार्डधारकांचे  वाद निर्माण होत आहेत या किटमुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तरी पुरवठादाराने लवकरात लवकर या कीट गावागावी पोहोचून लाभार्थ्यांना शिधा जिन्नस थेट उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुरवठा विभागाच्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल.

यावेळी तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन ठोसर युवा सेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, युवा शहर प्रमुख पवन गरुड, शेख समद कुरेशी, प्रा. कृष्णा मेहसरे, ज्ञानेश्वर निकम ( माऊली), रामभाऊ थोरबोले, रामराव तळेकर, प्रसाद पाटील, शिवम ढोले, सागर भोजने, सचिन निळे, बाळू पोलाखरे, सुरेश फरफट, अभिजीत भोंबे, मयूर ताटक्ष,सै.वसीम सै रहीम, जल्लोद्दिन चव्हाण,ईमामशाह,ऐजाज शेख,नासीरभाई सह आदींची उपस्थिती हो‌‌ते.

Powered by Blogger.