Breaking News
recent

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला 2 वर्षे सक्त कारावासाची शिक्षा व 10 हजार रुपये दंड- जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा दिला निकाल


    जळगाव या घटनेसंदर्भात माहिती अशी की,  अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सागर सुरेश मराठे (रा. धरणगाव) याला न्यायालयाने 2वर्ष सक्त कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष पोक्सो तथा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी बुधवारी हा निकाल दिला. पीडित बालिका ही तिच्या घराच्या अंगणात झोपलेली असताना सागर मराठे याने मद्याच्या नशेत  ११ मे २०१६ रोजी रात्री १२.३० वाजता अश्लील वर्तन केले होते

 घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड केल्याने तिच्या आई, वडिलांसह शेजाऱ्यांनी धाव घेत सागर याला पकडले होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी आठ साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. यात पीडिता व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. व या प्रकरणात तपास करणारे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांनी केलेला तपास ,साक्षी व पुराव्याअंती सागर मराठे याला दोषी धरण्यात आले.

Powered by Blogger.