Breaking News
recent

एकजुटीने लढा देण्याकरिता भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा - सिद्धार्थ हत्तीहंभिरे


प्रतिनिधी

    देशात व राज्यात भाजप हीं इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती वापरात असून जात धर्म भाषेच्या नावावर समाजामध्ये  न द्वेष पसरविण्याचे काम करीत असून सातत्याने राज्य घटनेची पायमल्ली करीत आहे त्याकरिता राज्य घटनेच्या सरक्षणा करिता  एकजुटीने लढा देण्याकरिता भारत जोडो यात्रेत सहभागी व्हा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीहांबिरे यांनी केले आज शेगाव येथे शासकीय विश्राम गृह येथे बुलढाणा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्हा आगमन प्रसंगी अनुसूचित जाती विभाग जिल्हा पदाधिकारी तालुका व शहर अध्यक्ष यांची पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीहांबीरे प्रदेश उपाध्यक्ष विनोद बेंडवाल. प्रदेश सचिव महेंद्र गवई,गौतम गवई,अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे,बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रमोद दादा अवसर्मोल, जिल्हा समन्वयक राजेंद्र वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

    यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद दादा अवसर्मोल यांनी राहुलजी गांघी यांच्या भारत जोडो यात्रेचे स्वागत करण्यासाठी तसेच जिल्ह्यात अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने सुरू असलेल्या प्रचार व प्रसार या बाबतची सविस्तर माहिती देवून अनुसूचित जाती विभागाच्या वतीने हजारो कार्यकर्ते निळी टोपी रुमाल परिधान करून राहुलजी गंघी यांचेवर पुष्प वर्षाव करून अनोख्या पद्धतीने स्वागत करणार असल्याची माहिती दिली यावेळी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद बेंडवाल. प्रदेश सचिव महेंद्र गवई,गौतम गवई,अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद डोंगरे,आदींनी मार्गदर्शन केले बुलढाणा जिल्हा हा राष्ट्रीय नेते मुकुलजी वासनिक साहेब यांचा असून त्यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाचे काम उल्लेखनीय असल्याबद्दल जिल्हाध्यक्ष प्रमोद दादा अवासरमोल,राजेंद्र वानखेडे व पदाधिकारी यांचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तिहांबिरे  अभिनंदन केले.

    बुलडाणा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या प्रचार करण्यासाठी तयार कण्यात आलेल्या प्रचार प्रसार रथाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीहंबिरे यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी बुलढाणा जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे सोशल मीडिया चे राजेंद्र वानखेडे,जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव गवई, जिल्हा उपाध्यक्ष सोपान पान पाटील, राजू नाडे, महेंद्र वानखेडे,  विजय सकळकर, भिकुभाऊ सारवान, मनोज बोदडे, अड सुरडकर, राजेंद्र राऊत,बळीराम नरवाडे,विलास सावळे,ऋषी अवसरमोल, आकाश धोलकर,ईश्वर मानकर,सुरेश वानखेडे आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र वानखेडे यांनी आभार लक्ष्मण राव गवई यांनी केले

Powered by Blogger.