मलकापूर येथे बुलडाणा जिल्ह्यातील निवड झालेल्या गावातील सरपंच ची बैठक संपन्न
पुण्यातील सुप्रसिध्द एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास चे ध्येय समोर ठेवून 2017 ला स्थापन झालेल्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पदाधिकारी नियुक्ती चा कार्यक्रम एम आय टी युनिव्हर्सिटी पुणे येथे संपन्न झाला या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राज्यमंत्री सौ भरतीताई पवार , श्री राहुल कराड राष्ट्रीय समन्वयक श्री योगेशजी पाटील ,सह समन्वयक श्री प्रकाशराव महाले यांच्या हस्ते राज्यातील पदाधिकारर्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यामध्ये राष्ट्रीय सरपंच संसदेचे बुलडाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून गजानन मिरगे बुलडाणा जिल्हा समन्वयक म्हणून ऍड. प्रवीण कडाळे, सह समन्वयक, अनिरुद्ध कोलरकर,संजय देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र तिल 36 जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यातील 1 गावाची निवड करून सी एस आर फंडातून त्या गावाचा विकास करण्याचे ध्येय सरपंच संसदेचे असून त्या अनुषंगाने एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचे राष्ट्रीय समन्वयक श्री योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली2017 मध्येच कार्य सुरू झाले होते परंतु कोरोना महामारी मुळे सदर कार्यात व्यत्यय आला होता.मागील वर्षी मलकापूर येथे बुलडाणा जिल्ह्यातील निवड झालेल्या गावातील सरपंच ची बैठक योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली होती त्या बैठकीला अनेक सरपंच व हरी गोसावी शिरीष डोरले यांची उपस्थिती होती,आगामी काळात श्री राहुलजी कराड व श्री योगेश पाटील यांना अपेक्षित असलेले कार्य मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अशी माहिती एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेचे 2017 पासूनच जिल्हा अध्यक्ष असलेले व आता परत फेरनिवड झालेले श्री गजानन मिरगे यांनी दिली