वान नदीत नवजात अर्भक आढळले, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा
मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर
संग्रामपुर तालुक्यातिल काटेल कोलद मार्गावर वान नदी पात्रात गावातिल काही नागरीक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी जनावरांना पाणी पाजण्या करीता गेले असतांना त्यांना नदी मध्ये पाच महिन्यांचे पुरुष जातीचे मृत अर्भक आढळले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अर्भक पाहण्यासाठी नागरीकांनी चांगलीच गर्दी केली. याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु आरोग्य यंत्रने़चं मौन होत. हे अर्भक अनैतिक संबंधातुन जन्मलेले असावे.अशी उलटसुलट चर्चा सुद्धा परीसरात होत आहे. याबाबत कोलद येथील पोलीस पाटील संजय मनोहर देऊळकार यांच्या फिर्यादीवरुन तामगांव पोलीस स्टेशन मध्ये अद्यात आरोपी विरुद्ध भादंवी कलम ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास तामगांव पोलीस स्टेशनचे ठानेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार किशोर तिवारी करत आहेत.