Breaking News
recent

उद्धव साहेब ठाकरे यांच्या शेतकरी मेळाव्या संदर्भातील प्रचार रथाचे विधानसभा संपर्कप्रमुख महेश केदारीं नी केले स्वागत


    मलकापुर:- चिखली येथे होऊ घातलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या शेतकरी मेळाव्याच्या प्रचारप्रसारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी बनविलेल्या प्रचार रथाचे मलकापुर शहरातील तहसील चौकात शिवसेना मलकापुर विधानसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांनी स्वागत केले.

    यावेळी विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुका प्रमुख दिपक चांभारे, युवा सेना शहर प्रमुख पवन गरुड, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार,दिपक कोथळकर सह शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती हा प्रचार रथ मलकापुर शहरातील सर्व प्रभाग तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जाणार असुन चिखली येथील शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संपर्कप्रमुख महेश केदारी यांनी केले आहे.

Powered by Blogger.