महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तिर्ण झालेल्या कु.निकिता साळुंकेंचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
मलकापुर:- शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरातील कु.निकिता चंद्रकांत साळुंके हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य कर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी या दोन्ही परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण केल्याने कु.निकिताने साळुंके हिने परीवारासह ,देशाचे, राज्याचे,मलकापुर शहराचे नावलौकिक वाढविल्याने निकिताचे घरी जाऊन निकिता, वडील चंद्रकांत साळुंके यांचा मलकापुर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना मलकापुर विधानसभा संपर्कप्रमुख महेश केदारी,शहरप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, तालुकाप्रमुख दिपक चांभारे, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार, बाळूभाऊ पोलाखरे, शेख समद कुरेशी, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले,किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार,किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम, युवा सेना शहर प्रमुख पवन गरुड, पत्रकार नितीन पवार, रामराव तळेकर,चाॅंद चव्हाण, मुस्ताक जमादार,हसन गौरीसह आदी पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.विधानसभा संपर्कप्रमुख महेश केदारी यांनी निकितास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देत आणखी उत्तरोत्तर प्रगती होवो असा आशिर्वाद दिला.