जिल्हात भगवान परशुराम रथ यात्रीचे जंगी स्वागत
विप्र फाउंडेशनच्या वतीने कांची कामकोटि पीठ (चैनई) ते जयपुर भगवान परशुराम रथ यात्रेचे खामगाव शहरात आगमन प्रसंगी समस्त बहुभाषीक ब्राह्मण समाज तर्फे या रथ यात्रीचे स्वागत करण्यात आले या वेळे खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांची विशेष उपस्थिती होती.
अरुणाचल प्रदेशात भगवान परशुरामची तपोभूमी आहे तेथे 51फुट उच पंचधातूची मूर्ति स्थापित करण्यात येणार आहे केंद्र सरकारने 1कोटि रूपयाचे अनुदान या कार्य करीता दिले आहे. या मूर्तिचा अंदाजीत खर्च 10 कोटि रु असून फेब्रुवारी महिन्या पर्यत बहुभाषीय ब्राह्मण समाज ही राशि संकलित करणार आहे.
या यात्रे सोबत येणाऱ्या अतिथि चा स्वागत कार्यक्रम ब्राह्मण सभा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने संभाजी नगर येथील C.A. शर्मा, राजेश बुटोले, यात्रचे प्रमुख स्वामी राम शर्मा व विप्र फाउंडशन जिल्हा अध्यक्ष दामोदर पांडे, विजय शर्मा, सुरेश शर्मा मलकापुर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन दै. देशोन्नति वर्तमान पत्रकाचे संम्पादक राजेश राजोरे यांनी केले. विप्र फाउंडेशन जिल्हा अध्यक्ष दोमोदर पांडे यांनी 1लाख रुपयाचा चेक भगवान परशुराम यांच्या मूर्ति करीता या प्रसंगी रथ यात्रा समिति यांना देण्यात आला. तसेच या प्रसंगी विप्र फाउंशन बुलढाणा जिल्हा कार्यकारणी घोषणा करुण ब्राह्मण एकतेच दर्शन घडून आले