भारतीय संविधान दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न
जिल्हा प्रतिनिधी
26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिना निमित्त हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर घेऊन मोठ्या थाटामाटा मध्ये संपन्न झाला आहे यावेळी अनेक पत्रकार बांधवांनी व नागरिकांनी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
भारतीय संविधानामुळे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला अश्या महान भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण अर्पण करून पुष्पहार वाहत दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
हिंदी मराठी पत्रकार संघ तसेच मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा शाखा मलकापूर यांचे ओम शांती विजन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या कार्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार हनुमान जगताप, डॉ. मारुती देशमाने, डॉ. प्रतीक अहिर, डॉ. वैष्णवी वावगे, डॉ.संतोष वावगे यांनी भूषवले कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदी मराठी पत्रकार संघाचे विदर्भ सचिव सतीश दांडगे तालुकाध्यक्ष उल्हास भाई करण्यात आले.
पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे या नेतृत्वापासून शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम या कार्यक्रमात मलकापूर शहरातील अनेक पत्रकार बांधव व नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली. नेत्र तपासणी शिबिराला संदीप भन्साली, ज्येष्ठ पत्रकार नथुजी हिवराले , विनायक तळेकर, हिंदी मराठी पत्रकार संघाचे शहर अध्यक्ष शेख जमील पत्रकार, दैनिक सम्राट चे संपादक भिवा चोपडे, मलकापूर अबतक चे संपादक सय्यद ताहेर, प्रकाश थाठे, रवी वाकोडे, योगेश सोनवणे, शरद सारसे सर, के प्लस न्यूज चे रिपोर्टर राहुल संबारे, मनीष शर्मा यांची विशेष उपस्थिती लाभली.
मलकापूर शहरात नव्याने सुरू झालेल्या मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा शाखा मलकापूर यांचे व्हिजन सेंटर व ओम शांती ऑप्टिकल्स यांच्या विशेष सहकार्याबद्दल तसेच मलकापुरातील गोरगरीब रुग्णांसाठी अत्यल्प फी मध्ये सुरू करण्यात आलेल्या नेत्र तपासणी केंद्राची याप्रसंगी हिंदी मराठी पत्रकार संघ (ISO 9001-2015 प्रमाणित) तर्फे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या.