राष्ट्रीय पत्रकार दिन हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने साजरा
जिल्हा प्रतिनिधी
मलकापूर 18/11/22 येथे राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून मलकापूर येथे हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने कार्यालय येथे उत्साहात संपन्न झाली आहे.
त्यावेळी सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मला अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरीब अन्यायग्रस्तांना तसेच सर्वसामान्यांना न्याय द्यावा असे आव्हान देखील यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे त्यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष तथा अहिल्या राज संपादिका धनश्रीताई काटीकर पाटील, ज्येष्ठ पत्रकार उल्हासभाई शेगोकार,अजय टप, विनायक तळेकर, नथुजी हिवराळे, सतीश दांडगे, गौरव खरे, स्वप्निल आकोटकर, योगेश सोनवणे, श्रीकृष्ण तायडे, करणसिंग शिरस्वाल, श्रीकृष्ण भगत ,सय्यद ताहेर , शेख जमील, प्रकाश थाटे , ईश्वर दीक्षित ,आदी पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.