हिंदी - मराठी पत्रकार संघाच्या मलकापुर शहर अध्यक्ष पदी शेख जमिल भाई यांची नियुक्ती
प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे व आपल्या निर्भीड व रोखठोक बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेले साप्ताहिक शब्द की गुंज मुख्य संपादक शेख जमिलभाई जान मोहम्मद यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मलकापुर शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे . सदर निवड महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन केली.
सदर निवडीबद्दल मलकापुर शहर अध्यक्ष पदी शेख जमिल भाई यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हिंदी मराठी पत्रकार शहर कार्यकारणीला पुढे नेत हिंदी मराठी पत्रकार संघाचे काम संपूर्ण जिल्हाभर पोहोचवण्याचे काम पूर्ण ताकदीने करणार असल्याची ग्वाही यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाचे नियुक्त शहर अध्यक्ष शेख जमील भाई यांनी दिली