ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच पदासाठी १४ तर सदस्य पदासाठी ४० उमेदवारी अर्ज दाखल
नांदुरा तालुक्यातील कार्यकाळ संपलेल्या १३ ग्रामपंचायतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होऊ घातली असून त्यामध्ये निमगाव, अवधा, भोटा, पातोंडा, माटोळा, पिंपरी आढाव, कोकलवाडी, वडगाव डीघी, तरवाडी, मुरंबा, वळती बु, तिकोडी, दहिवडी, या ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यामध्ये ३० नोव्हेंबर रोजी सरपंच पदासाठी १४, तर सदस्य पदासाठी ४० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये निमगाव ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ३, तर सदस्य पदासाठी ७, ग्रामपंचायत भोटा सदस्य पदासाठी २, माटोळा सरपंच पदासाठी १, सदस्य पदासाठी ५, पिंपरी आढाव सरपंच पदासाठी २, सदस्य पदासाठी २, कोकलवाडी सदस्य पदासाठी १, वडगाव दिघी सरपंच पदासाठी ५, सदस्य पदासाठी ७, तरवाडी सरपंच पदासाठी २, सदस्य पदासाठी ५, तीकोडी सरपंच पदासाठी १, सदस्य पदासाठी ४, दहिवडी सदस्य पदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत अवधा
पातोंडा मुरंबा वळती या ग्रामपंचायती मधून आज एकही उमेदवारी अर्ज अर्ज दाखल नसल्याचे तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी तालुका नांदुरा यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.तसेच बिनविरोध ग्रामपंचायतींना मलकापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी एकडे यांनी २५ लक्ष रुपयाचा विशेष निधी देण्याचे आवाहन केले असून नांदुरा तालुक्यातील १३ ग्रामपंचायत पैकी किती ग्रामपंचायत बिनविरोध होऊन २५ लक्ष रुपयांचा विशेष निधी घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.