Breaking News
recent

अत्याचारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन तरूणीने अर्भक जमिनीत पुरले! चाईल्ड वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून घटना उघडकीस

 


मलकापूर: आधी बळजबरीने अतिप्रसंग झाला‌.बदनामी होईल या भितीपोटी जन्माला आलेले अभ्रक पुरविण्यात आले.मौजे माकनेर शिवारात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर हा बाका प्रसंग ओढावल्याची घटना चाईल्ड वेलफेअर ट्रस्ट च्या माध्यमातून उघडकीस आली आहे.या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्कार व पो स्को अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, आगस्ट महीन्यात अल्पवयीन १७ वर्षीय मुलीला मौजे माकनेर शिवारात अज्ञात दोघांनी रस्त्यावर अडवले.एकाने हात ,पाय धरले तर दुसऱ्याने जबरीने अतिप्रसंग केला.व दोघेही पसार झाले.त्या मुलीने आरडाओरड केली मात्र आजूबाजूला कुणीच नसल्याने लाभ झाला नाही. या घटनेनंतर पिडीत मुलीने कसेबसे घर गाठले व घरच्यांना हा प्रकार सांगितला.मात्र बदनामीच्या भितीपोटी घरच्यांनी हे प्रकरण दडपून टाकले.    अशातच दि.२६ नोव्हेंबर रोजी पिडीत मुलीने अभ्रकास जन्म दिला.

त्यामुळे तिच्या घरातील मंडळी चांगलीच हादरुन गेली.व त्यांनी त्या अभ्रकाचा दफनविधी माकनेर शिवारातील एका शेतात उरकून टाकला.त्यामुळे प्रकरण जिकडे तिकडे झाल्याचा समज पिडीतेच्या घरच्यांचा झाला होता.  या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार गावातीलच अज्ञात व्यक्तीने चाईल्ड वेलफेअर ट्रस्ट मुंबई कडे तक्रार दिली.त्या अनुषंगाने हालचाली झाल्या व बुलढाणा येथील चाईल्ड वेलफेअर ट्रस्टची टिम मलकापूर तालुक्यात दाखल झाली.व पिडीत मुलीला बुलढाणा येथे नेण्यात आले व तिचा जवाब नोंदविण्यात आला.

 त्यांच्या सूचनेनुसार ग्रामस्तरावरील बालकल्याण समितीने मलकापूर ग्रामीण पोलीसात फिर्याद दाखल केली होती.त्या अनुषंगाने मलकापूर ग्रामीण पोलीसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध अपराध नं.२६९/२२ कलम ३७६,३४ भादवीसह पो.स्को.अन्वये आज बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.तर पोलिस उपनिरीक्षक फरहात मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव तायडे तपास करीत आहेत.

    दरम्यान या प्रकरणी वेगवेगळ्या प्रश्नांना वाट फुटली आहे.अभ्रकाचा दफनविधी मेल्यावर झाला की  त्याचा खून करण्यात आला.आरोपी मलकापूर परिसरातील कि बाहेरगावाहून आले होते.पिडीत मुलगी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थीनी आहे त्यामुळे तिच्याशी कोणत्या कारणासाठी अतिप्रसंग ओढावला असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

 वरिष्ठ अधिकारी दाखल..! मलकापूर तालुक्यातील मौजे माकनेर शिवारात अल्पवयीन मुलीवर ओढावलेल्या जबरी अतिप्रसंग प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी हे देखील मलकापूरात दाखल झाले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनात पोलिस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्नात आहेत.त्यामुळे या प्रकरणाच गुढ उकलण्याची शक्यता आहे.


त्या अभ्रकास उकरून काढले..!

    मौजे माकनेर शिवारात पिडीत अल्पवयीन मुलीच्या पोटी जन्माला आलेल्या व शेतात पुरविण्यात आलेल्या त्या अभ्रकास,आज बुधवारी नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत उकरून काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.त्या अभ्रकाच्या वेगवेगळ्या तपासण्या करून पुन्हा त्या अभ्रकाचा दफनविधी करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Powered by Blogger.