देऊळगाव माळी येथे रंगणार भव्य कुस्त्यांची आम दंगल
महिलांच्या सुद्धा होणार कुस्त्या एक लाख रुपयाची जंगी लूट
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
लाल मातीतील खेळ लोप पावत आहे. हा खेळ टिकला पाहिजे म्हणून कुस्त्यांचे माहेरघर समजले जाणारे मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी गाव. त्याच अनुषंगाने कित्येक वर्षाची परंपरा म्हणून दरवर्षी प्रमाणे याही वर्षीक्रांतीसुर्य क्रीडा तालीम संघ व गावकऱ्यांच्या वतीने प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी येथे दिनांक 6 नोव्हेंबर रविवारला महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ म्हणजेच कुस्ती या खेळाची आयोजन करण्यात आले आहे.
तब्बल एक लाख रुपयांची जंगी लूट सहा नोव्हेंबरला कुस्ती खेळाच्या माध्यमातून होणार आहे. महिलांच्या कुस्त्यांमध्ये सिंगल जोडी लावून रक्कम ठरवण्यात येणार आहे. स्पेशल ऑफरचे पैलवान नंबर मध्ये खेळतील त्यांना सिंगल जोड खेळण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल. अशी माहिती क्रांतीसुर्य तालीम संघ यांच्याकडून मिळाली आहे. तरी या लाल मातीतील खेळाचा समस्त पंचक्रोशीतील पहिलवान मंडळी तसेच प्रेक्षकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन क्रांती सूर्य क्रीडा तालीम संघाचे अध्यक्ष किसन बळी व समस्त पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.