Breaking News
recent

नागेश्वर पाटेकर मा.लो.प जिल्हा अध्यक्ष यांच्या उपोषणाची सांगत



शेगाव प्रतिनिधी

    शेगाव मातंगपुरी पुनर्वसनाच्या व इतर मागण्या बाबत दिनांक 28/ 10 /2022 शुक्रवार पासून शेगाव नगरपरिषद समोर मा.लो.प जिल्हा अध्यक्ष नागेश्वर जी पाटेकर यांच्या उपोषणाची सहाव्या दिवशी घेतली प्रशासनाने दखल सदर मागण्या १) म्हाडा कॉलनी वासियांना सातबारा आठ अ देण्यात यावे २) म्हाडा कॉलनी मधील शिल्लक असलेले सदनिका हे स्थानिक गरजू नागरिकांना देण्यात यावे ३) सानुग्रह दोन लाख रुपये  पुनर्वशीताना देण्यात यावे ४) मुरारका हायस्कूल जवळ लहुजी नगर चे स्थलांतर करून पुनर्वसन करण्यात यावे ५) खळवाडी पुनर्वसन मध्ये जात असलेले क्रांती गुरु वीर लहुजी वस्ताद साळवे मार्केट हे नाव नगर परिषद समोर होत असलेल्या इमारतीला देण्यात यावे ६) खळवाडी पुनर्वसन मध्ये बेघर झालेले कुटुंबाला सदनिका देण्यात यावे ७) म्हाडा कॉलनी डीपी रोड सैनिक कॉलनी व जगदंबा रोड या चौकास  शिव लहू भीम असे नामकरण करण्यात यावे ८) क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे चौक मधील पोलीस टावर काढण्यात यावे या या मागण्या बाबत उपोषण सांगत 

  वेळी नागेश्वर पाटेकर यांना शेगाव नगरपरिषदच्या मुख्याधिकारी जयश्री बोराडे मॅडम ने दिले पत्र सादर मागण्याबाबत आयुक्त कार्यालयाला योग्य पाठ पुरवठा करू याच वेळी नागेश्वर पाटेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्याधिकारी मॅडमला दिले निवेदन सदर आमच्या मागण्याबाबत एक महिन्याच्या आत आम्हाला योग्य ते हालचालि न दिसल्यास  सदर स्थगित केलेले उपोषण हे आयुक्त कार्यालय अमरावती येथे नेऊन असा इशारा दिला यावेळी माझी नगराध्यक्षपती पांडुरंग बूच माजी पाणीपुरवठा सभापती गजानन भाऊ जवंजाळ पवन शर्मा भाजप  शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे प्रहार चे निलेश घोंगे मातंग समाज समितीचे संजय बोदडे जिओ तायडे उपस्थित होते .

    तसेच पुनर्वशीताचे कार्यकर्ते  मुकेश गवई विक्रम सौदे दादाराव भाऊ वानखडे विनोद सोनवणे मुकेश अंजनकार रवींद्र तायडे  विजय सावळे माणिक सोनवणे रमेश तायडे सुनील तायडे यांच्या मार्गदर्शनात व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष अध्यक्ष गोपाल तायडे यांच्या नेतृत्वात नागेश्वर पाटेकर यांच्या उपोषण समर्थांनात गांधी चौक येथे  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये अमोल सावळे गोपाल तायडे राजेश गवई ज्ञानेश्वर तायडे किसन तायडे सागर सुरडकर व बहुसंख्येने महिला पुरुष समाज  व समस्त समाज बांधव जमलेले होते रास्ता रोको आंदोलन करताना शेगाव पोलीस स्टेशनला आंदोलन करताना स्थानबद्ध करण्यात येऊन नंतर सोडण्यात आले होते.

Powered by Blogger.