हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मलकापूर शहर व शिवसेना तालुका तर्फे अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न
मलकापूर:- हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक विश्रामगृहावर आज दि.17 नोव्हेंबर रोजी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर,सह संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, युवा सेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, उपजिल्हा प्रमुख रविंद्र भोजने, उपजिल्हा प्रमुख संजयसिंह जाधव, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मलकापुर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
यावेळी तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील,शहर प्रमुख गजानन ठोसर, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुकाप्रमुख महादेवराव पवार, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, शिवसेना उपशहरप्रमुख बाळुभाऊ पोलाखरे,विजय झांबरे, सचिन निळे, आकाश बोरले,हसन गौरी,मधुकर चित्रंग, गजानन झोपे, गजानन चिकटे, संतोष बोरले,सुरेश वाघ, विशाल फुकटे, विनोद कचरे, सुभाष कवळे, मोहम्मद जुनेद अब्दुल रसूल सह शिवसैनिकांची उपस्थित होते.