लव जिहाद विरोधात केंद्र सरकार ने केंद्रीय कानून बनवावा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल
मलकापूर
देशात हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून लव जिहाद ची शिकार बनवण्याचे षडयंत्र दिवसेंदिवस वाढत आहे. कित्येक हिंदू मुलींना आपला जीव गमवावा लागला. श्रद्धा वायलकर मुंबई या मुलीची तिच्या अफताब प्रियकराने कृपण हत्या केली नंतर तिचे शरीराचे 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून रोज एका तुकड्याची विल्हेवाट लावण्याचा काम सुरू होतं. त्यानंतर लखनऊ मध्ये चौथ्या मजल्यावरून गुप्ता नामक मुलीला प्रियकराने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले. देशात कित्येक मुली लव जिहादच्या शिकार बनलेले आहेत.
त्यासाठी केंद्र सरकारने लव जिहाद विरोधात केंद्रीय कानून लागू करावा व श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन आज आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालय मलकापूर त्यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना देण्यात आले. त्यावेळी विदर्भ प्रांत मंत्री जीवनसिंग राजपूत, संपर्कप्रमुख भूपेश पाटील, तालुकाध्यक्ष ऋषिकेश नेमाडे, सुशांत शेळके शिवाजी वेरुळकर श्रावण बाजोडे आशिष पागृत, केदार पाटील संदीप शिंदे, गोपाल पाटील शुभम बोरसे ईश्वरसिंग राजपूत संदीपसिंग राजपूत गणेश गायकवाड सचिन चोपडे मोहन आढाव कार्तिक श्रीनाथ प्रतापसिंग जाट व आदी बजरंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.