चिखली शहरातील गांधी नगर मधील रस्त्यांवर स्पिड ब्रेकर टाका--युवा सेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर यांची मागणी
प्रतिनिधी/भरत जोगदंडे
चिखली शहरांतील प्रभाग क्र. ५ मधील गांधी नगर रस्त्यांवर व खास करून इरतकर सरांच्या घराजवळ कॉर्नर असल्यामुळे व रोड सुध्दा नविन सिमेंट कॉक्रेटीकरण झाल्यामुळे वाहनाचा वेग खुप वाढला असुन त्या परिसरात स्पिड ब्रेकर नसल्यामुळे आतापर्यंत ७ ते ८ अपघात झाले आहे.
त्यामुळे इरतकर सर यांच्या घराच्या समोर त्यानंतर विष्णुपंत घोंगे यांच्या घरासमोर तसेच शेख रशिद, सुरेश किराणा कॉर्नर इत्यादी ठिकाणावर स्पिड ब्रेकर लवकरात लवकर टाकण्यात यावा, जेणे करून यापुढील सुध्दा आपघात होण्यापासून थांबतील अशी मागणी युवा सेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर यांनी न. प. मुख्यधिकारी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे