बॅंकांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरील हॉल्ट काढावा: स्वाभिमानीचा आंदोलनाचा ईशारा
प्रतिनिधी जिल्हा
यंदा खरीप हंगामा मध्ये शेतकऱ्यांन वर्ती आभाळच कोसळले असे म्हणावे लागेल. मोठ्या प्रमाणात पळलेल्या पावसानें शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून निघालेल्या आहेत. पिके पाण्या खाली आले आहेत.काही ठिकाणी पिके वाहून सुद्धा गेलेली आहेत. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणा मुळे हेरावून गेला आहे.त्या मुळे शेतकऱ्यांना अतिरुष्टीची मदत मिळावी करीता स्वाभिमानी शेतकरी संघटना विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात शेगाव, संग्रापूर, जळगाव. जा, अकोला, मराठावा येथे माघील दोन महिन्या पासून आंदोलन केले आहेत.त्यांच्या आंदोलनाचा धसका घेत काही पंचांनाने पूर्ण करीत त्या ठिकाणाची अति्रुष्टीची मदत जाहीर होऊन शासना मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत, अनुदान मिळत आहे.
जसे (मनसगाव सर्कल ) परंतु शासना कडून मिळत असलेली मदत बँका मार्फत कर्ज खात्यात जमा केल्या जात आहे, किंवा शेतकऱ्यांच्या खात्याला हॉल्ट लावण्यात येत आहे. शासनाचे अतृष्टीचे, सतत च्या पावसाचे पंचंनामेच अजून पूर्ण केलेले नाही. आणि काही ठिकाणाचे पंचनामे पूर्ण होऊन शासनाची मदत जाहीर झाली परंतु बँका शेतकऱ्यांच्या खात्याला हॉल्ट लावात आहे. व शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीच्या रक्कमे मधून संधी साधून आयत्या बिळातील नगो बा प्रमाणे कर्ज फेळून घेत आहे.येन दिवाळीच्या वेळेस बँक अश्या प्रकारे वागणे बर नाही. आधीच संकटात सापळलेला शेतकरी शासनाच्या तुटपुंजी मदतीची वाट पाहत होता त्या तुटपुंज्या मदतीवरही बॅंका डल्ला मारत आहे. त्या मुळे अश्या परिस्तिथी शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केलीच नाही. आणि निसर्ग सात देत नाही.
मायबाप सरकार तुटपुंजी मदत देते. त्या वर ही बॅंकेचा डोळा शेतकऱ्यांनी कराव काय.कोरोना काळात अख्ख जग घरात बसून होत परंतु शेतकरी मात्र शेतात जाऊन अण्ण पिकविल अण्णा कमी पळूदिल नाही. अख्या देश संकटात अस्ताना शेतकरी आपली नेतीक जबाबदारी समजते. मंग शेतकऱ्यांना जगवण्याची जबाबदारी शासनाची नाही का. त्या मुळे शासनाने आदेश जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरचा होल्ड काढण्याचे आदेश द्यावे. अन्यथा कोणत्याही क्षणाला स्वाभिमानी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलन करू या वेळेस स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे, निवृत्त ढोले, अतुल फुलकर,वैभव मानकर, राहुल फुलकर, भिवा वानखेडे बुद्धिवान फुलकर शेतकरी उपस्तित होते.