देऊळगाव माळी येथे रंगला लाल मातीतील खेळ, कित्येक वर्षाची परंपरा जपणारे क्रांतीसुर्य क्रीडा तालीम संघ
मेहकर तालुका प्रतिनिधी, शिवशंकर मगर
देऊळगाव माळी म्हटलं म्हणजे सर्वगुणसंपन्न गाव. कुस्त्यांचे माहेरघर, प्रति पंढरपूर म्हणून समजले जाणारे, शैक्षणिक सामाजिक राजकीय दृष्ट्या भरभक्कम पाया असणारे जिल्ह्यातील एक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. आता पाश्चात्य खेळामुळे महाराष्ट्रातील बरेचसे खेळ लोप पावत चालले परंतु देऊळगाव माळी येथील क्रांतीसुर्य तालीम संघ यांनी लोप पाव त चाललेले खेळ जिवंत राहिले पाहिजे यासाठी नेहमीच प्रयत्न असतो. त्याचं अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्तिक यात्रा महोत्सवाचे आणि त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी भव्य अशा कुस्त्यांची आम दंगल पार पडली. त्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार डॉ.संजय गरकल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून टी. एल. मगर, सरपंच किशोर गाभणे, व मान्यवर मंडळी यांची उपस्थिती लाभली.या कुस्त्यांची प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे मुलाविरुद्ध मुलींची कुस्ती व मुलींच्या सिंगल जोड कुस्त्या. प्रेक्षकांनी यांच्या कुस्त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
या कुस्त्यांमध्ये जवळपास तीन लाख रुपयांची जंगी लूट पार पडली. महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या पैलवानांनी आपला खेळ दाखवला.
भव्य अशा कुस्तीच्या आम दंगली मध्ये खालील प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आली होती. प्रथम बक्षीस-पंधरा हजार एक रुपये , (प्रकाश डोंगरे मित्र मंडळ तर्फे) या बक्षीसाचे मानकरी जगदीश राजपूत जालना, तर उपविजेते म्हणून ज्ञानेश्वर पाणबुडे हिंगोली, द्वितीय बक्षिस-अकरा हजार एक रुपये,(संजय वडतकर यांचे तर्फे) या बक्षीसाचे विजेते अरुण राजपूत जालना, तर उपविजेते महेश उगले वाशिम, तीसरे बक्षीस- सात हजार एक रुपये , (श्री संत सावता माळी मित्र मंडळ तर्फे) विजेते मेहबूब पैलवान वाशिम तर उपविजेते, नवनीत सिंग पंजाब चौथे बक्षीस- पाच हजार एक रुपये,(श्री विजय गारोळे तेजस्वी संस्थान वरुडी यांच्यातर्फे)- वैभव थोरवे जालना, उपविजेते लक्ष्मण इंगोले वाशिम,पाचवे बक्षीस-चार हजार एक रुपये,(श्री सखारामजी पाटील मगर यांचे तर्फे) भाऊसाहेब कांबळे जालना, तर उपविजेते शिवा मोरे जालना,सहावे बक्षीस- 2001 रुपये,(श्री कुंडलिकरावजी मगर माजी सैनिक यांचे तर्फे) गोपाल मटाले, उपयोजिता नंदकिशोर खाराडे,सातवे बक्षीस- पंधराशे एक रुपये,(श्री माधवराव जी मगर पोस्ट मास्टर यांचे तर्फे) विशाल पैलवान हिंगोली, तर उपविजेते राम यादव पातुर, अशाप्रकारे आणि पहिलवानांनी आपला खेळ दाखवत बक्षिसे जिंकली.तसेच कुस्ती नियोजनासाठी बाबुरावजी बळी यांचे तर्फे 5001 रुपये, विश्वनाथ जी मगर यांचे तर्फे 5001रू.विश्वनाथ बाहेकर यांचे तर्फे 5001रू. उकंडराव आडे चायगाव 3001 रु अशा अनेक दानशूर व्यक्तींनी हा खेळ टिकला पाहिजे या दृष्टीने मदत केली.या कुस्ती दंगली मध्ये अनेक सिंगल जोड लावण्यात आल्या होत्या.
एक लाख रुपयांची जंगी लूट कुस्ती दंगल मध्ये होणार होती परंतु पैलवानांचा प्रतिसाद पाहता तीन लाख रुपयांपर्यंत जंगी लूट कुस्ती दंगलीत झाली. क्रांतीसुर्य तालीम संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या भव्य अशा कुस्ती दंगलीचे धावते वर्णन व आपल्या वाणीतून प्रेक्षकांना अनंत नवाडे,माधवराव तायडे, सारंग परदेशी, विजय राजगुरू, कैलास राऊत,राजेश मगर शिवशंकर मगर, संजय खरात, यांनी खिळवत ठेवण्याचे काम केले. तर आभार प्रदर्शन किसन बळी यांनी मानले. कुस्त्यांची ही भव्य आम दंगल यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी क्रांतीसुर्य क्रीडा तालीम संघाचे समस्त पदाधिकारी,कार्यकर्ते, तथा ग्रामस्थ मंडळी यांनी प्रयत्न केले.