Breaking News
recent

बिलोलीत जिल्हा परिषद हायस्कुलला भीषण आग अग्निशमक दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात


नांदेड जिल्हा प्रतिनिधी - वैभव घाटे

  शहरातील कांही अंशी मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद हायस्कुलला ३० अॉक्टोंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास भीषण आग लागली,सदर शाळेत मोडकळीस पडलेले फर्निचर असल्याने आगीने आपले रौद्ररूप धारण करीत असतांना अगदी वेळेवर येथील नगरपरिषदेचे अग्नीशमक दलाचे वाहन घटना स्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यामुळे मोठी हानी टळली आहे. बिलोली शहरातील सर्वात जुनी असलेली जि.प.शाळा ही पटसंख्या,कॉन्वेन्टची वाढती संख्येमुळे सदर शाळा अडगळीस पडली.सध्यस्थितीत शाळेला दिपावलीच्या सुट्या असल्यामुळे आगीत नेमके काय नुकसान झाले याची माहीती मिळू शकली नसली तरी आगीत शाळेचे रेकार्ड,फर्निचर जळाल्याची माहीती समोर येत आहे.

   घटनेची माहीती समजताच माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी कुंडलवाडी-बिलोली नगरपरिषदेच्या अग्नीशमक दलाच्या गाडीला तात्काळ पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासा नंतर आग आटोक्यात आली आहे.तर नेमकी आग कशामुळे लागली हे समजु शकले नाही ज्यात आग शाँर्टसर्कीटमुळे म्हणावे तर एक रुम सोडले तर संपुर्ण शाळेत विज पुरवठा नाही याचा अर्थ कोणीतरी खोडसाळ पणाने ही आग लावल्याची चर्चा हायस्कुल परिसरात होती.येथील नगर परिषदेच्या अग्नीशमक दलाची गाडी येवुन पुर्णपणे आग आटोक्यात आणली,आग आटोक्यात आणण्यासाठी ,काँग्रेसचे वलिओद्दिन फारुखी,अमजद चाऊस,सहशिक्षक संजीव गंजीगुडे,राजु गादगे,साईनाथ शिरोळे,लईक सिध्दीखी,प्रदीप ढिल्लोड,भीम कुडके,चालक आसीफ, यांच्यासह अनेकांनी सहकार्य केली यावेळी बिलोली पोलीसांचेही सहकार्य मिळाले.


बिलोली तालुक्यातील सर्वात जुनी असलेली जि.प.शाळेला लागलेल्या आगीत अनुचित प्रकार घडला नाही माञ सुट्ट्या असल्या तरी शिक्षकांचा पहारा असला असता तर आगीचा प्रकार घडला नसता.शाळेला पुन्हा उभारी देण्यासाठी प्रयत्न करणार. -संतोष कुलकर्णी  माजी नगराध्यक्ष बिलोली

Powered by Blogger.