तहसील कार्यालय शेगाव श्री.गजानन महाराज संस्थान च्या वाटिका संकुलाक स्थलांतरित
शेगाव :- तहसील कार्यालय शेगाव करिता नवीन इमारत बांधण्यासाठी शासनाकडून मंजुरात प्राप्त झालेली असून तहसील कार्यालयाचे गैर सोय टाळण्यासाठी तहसील कार्यालय शेगाव हे तात्पुरत्या स्वरूपात श्री. गजानन महाराज संस्थानच्या वाटिका संकुल खामगाव रोड शेगाव येथे स्थलांतरित करण्यात येत आहे, तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग व अभिलेख रेकॉर्ड विभाग सध्या आहे त्याच जुन्या तहसील कार्यालयात राहतील व त्यांचे कामकाज तिथूनच चालेल तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी पुरवठा व अभिलेख विभाग सोडून इतर विभागाशी संबंधित कामकाज असल्यास श्री.गजानन महाराज संस्थान यांच्या खामगाव रोड वाटिका संकुलात स्थलांतरित झालेल्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार शेगाव श्री. समाधान सोनवणे यांनी केले आहे,