राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
भरत जोगदंडे
राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7751 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही 18 नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या- अहमदनगर- 203, अकोला - 266, अमरावती - 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा - 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर - 59, धुळे- 128, गडचिरोली - 27, गोंदिया- 348, हिंगोली - 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर - 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार - 123, उस्मानाबाद- 166, पालघर - 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली - 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे - 42, वर्धा - 113, वाशीम 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. (एकूण 7,751)
चिखली तालुक्यातील ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणुका जाहिर
राज्य निवडणूक आयोगाने चिखली तालुक्यातील २८ ग्रा.पं. सार्वत्रिक निवडणुका जाहिर केल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेमधून असल्याने गावोगावीतील ग्रा.प चे राजकारण चांगलेच तापणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण भागातील ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या चिखली तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकां संबंधीत तहसीलदार डॉ अजित कुमार येळे यांच्याकडून १८ नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करण्यात येइल. नव्याने स्थापित ग्रा. पं. तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील सार्वत्रिक निवडणुकांमधून वगळलेल्या ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच) संगणक प्रणालीव्दारे राबविण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा २८ नोव्हे रोजी ते ०२ डीसे रोज
नामनिर्देशनपत्रे छाननी ५ डिसेंबर रोजी सोमवार वेळ सकाळी ११ वाजतापासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्रे मागे घेणे ७ डिसेंबर रोजी बुधवार, त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप ३ वाजेनंतर, मतदान १८ डिसेबर रोज रविवार, वेळ सकाळी , ७.३० ते ५.३० वाजे पर्यंत आणि मतमोजणी व निकाल 20 डिसेबर 2022 प्रमाणे घोषित करण्यात येणार आहे. यामध्ये चिखली तालुक्यातील उदयनगर, मोहोदरी, कव्हळा, धोडप, , आंधई, पिंपरखेड, डासाळा, किन्ही , सवडत, भानखेड, मुंगसरी, बेराळा, महिमळ, करतवाडी, वरखेड, सावंगी गवळी, सोनेवाडी, सातगांव भुसारी, भोकर, कोनड, मिसाळवाडी, इसरुळ , , रानअंत्री, चंदनपुर, मनुबाई गुंजाळा, , बोरगांव वसू, पांढरदेव, पाटोदा अशा एकूण २८ ग्रा. पं. साठी सार्वत्रिक निवडणुकिंचा बिगुल वाजला असून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र आता दोन महिन्याकरीता ग्रा. प. वर प्रशासक लागणार आहे.