Breaking News
recent

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त स्वाभिमानी वतीने अभिवादन



शेगाव प्रतिनिधी

क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे  यांच्या 228 व्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळेस क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे याचा जयघोष करीत त्याच्या कार्यास उजाळा देण्यात आला. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे पूर्वज  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात महत्त्वाच्या जबाबदारी या पदावर होते. त्यांच्या आजोबा कडे पुरंदर किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी होती.क्रांतीगुरु लहुजी  वस्ताद साळवे यांचे घराणे युद्ध कला व शस्त्र चालवण्यामध्ये निपुण होते. लहुजी वस्ताद यांनी आपल्या वडिलांन कडून शस्त्र चालवणे व युद्ध कलेचे प्रशिक्षण घेतले होते.त्या मुळे  पूर्वापार चालत असलेल्या गुलामी मधून मायभूमिला पारतंत्र्याच्या जोखंडातून मुक्त करण्या करीता सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवून व ती स्वतः हाती घेऊन ती मशाल तेवत ठेवण्याकरीता सशस्त्र तालीम आखाळा सुरु केला. 

  या सशस्त्र आखाड्यात सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या शीकविल्या जायच्या मातृभूमिला गुलामीच्या लोखंडातून मुक्त करण्याकरिता काही सळसळत्या रक्ताच्या क्रांतिकारक तरुणांनी या आखाड्यात प्रवेश करून लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून सर्व युद्ध कलेचे प्रशिक्षण घेतले. त्या मध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य  टिळक, बळवंत फडके, हे होते. मातृभूमीला स्वतंत्र करण्याकरिता  सर्वतोपरी प्रयत्न केले म्हणून क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना सशस्त्र क्रांतीचे  जनक म्हणतात. अश्या थोर क्रांतीकाराची आज जयंती असून स्वाभिमानी शेतकरी संघटने शेगाव शहर वतीने त्याच्या पावन स्मृतीस  अभिवादन करण्यात आले.

Powered by Blogger.