बिरसा मुंडा जयंती साजरी
तेजश्री बहुउद्देशीय संस्था दहिगांव ता.नांदुरा जि. बुलढाणा जि. प.शाळा कालूसिग टापरी यांच्या माध्यमाने बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली तेजश्री बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष. श्रीकांत हरिहर आळशी यांनी सातपुडा कुशीतील शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले बिरसा मुंडा जयंतीत उपस्थित लिंगा पटेल, आनंद वैराळकर सर, खुमसिंग पावरा ,बिरबल पावरा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयसिग पावरा ,फाट्यासिंग पावरा महेंद्र पावरा ,जयमल महाराज ,विजय महाराज, नका पावरा ,सुरेश पावरा,नज्यासिंग पवार इत्यादी उपस्थित होते शेवटी मुख्याध्यापक आनंद वैराळकर सर यांनी बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर, १८७५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . नंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.