आजादी का अमृत महोत्सव निमित्त दाताळा येथे विधी मार्गदर्शन शिबिर संपन्न
आजादी का अमृत महोत्सव निमित्त तालुका महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी दिलेल्या प्रमाणे ग्रामीण भागातील लोकांचे सशक्तिकरण याकरिता दिनांक १०/११/२०२२ रोजी दाताळा येथील डी एस हायस्कूल येथे सायंकाळी ६-३० मि. शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अध्यक्ष म्हणून मलकापूर येथील जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्री पी. आर. कदम तर सदर कार्यक्रमांमध्ये पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याकरिता पंचायत समितीचे व्हिडिओ श्री होळकर कथा महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना संदर्भात माहिती देण्याकरिता तहसीलदार श्री आर यु सुरळकर हे देखील उपस्थित होते सदर कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मलकापूर वकील संघाचे जेष्ठ सदस्य श्री एस एस मोरे तथा वकील संघाचे सदस्य जी.डी. पाटील हे देखील उपस्थित होते सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर श्री देशिंगकर साहेब तथा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्री कुलकर्णी साहेब हे देखील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये श्री होळकर साहेब यांनी विविध योजनांची माहिती देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तथा श्री सुरडकर साहेब यांनी महसूल विभागामार्फत चालवण्यात राबविण्यात येणार आहे विविध योजनांची माहिती दिली तथा मतदारांनी आपले आधार कार्ड मतदान कार्ड सोबत संलग्न करण्याविषयी आवाहन केले. त्यानंतर एस एस मोरे यांनी महसूल कायद्याविषयी माहिती देऊन नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा दस्त तयार करतेवेळी वकिलांचे मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून भविष्यात होणाऱ्या वाद विवादापासून त्यांची सुटका होऊ शकेल असे आवाहन केले. तसेच अॅड श्री जी डी पाटील यांनी मोफत विधी सहाय्य हे कोणत्या व्यक्तीस मिळू शकते व कोणते स्वरूपात मिळू शकते .
याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी अध्यक्ष भाषणांमधून श्री पी. आर. कदम साहेब यांनी उपस्थित त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून लोकांनी प्रि लिटिगेशन च्या माध्यमातून कोर्टात दावा दाखल करण्यापूर्वीच तो कसा आपसात करता येईल याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष सोमण हे देखील उपस्थित होते .तसेच कार्यक्रमास वकील संघाचे सदस्य श्री धुत, आर. व्ही. पाटील, एदलाबादकर तथा नारखेडे व महिला सदस्य शुक्ला, संचेती, पाटील ,अग्रवाल, राजपूत अहुजाअशी सर्वांनी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
संचालन अँड. जे डी तायडे यांनी केलेआभार प्रदर्शन अँड. धुत यांनी केले सदर कार्यक्रमास डी. ई. एस हायस्कूलचे प्राचार्य तथा कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.सदर कार्यक्रमास दाताळा येथील बहुसंख्य नागरिक तथा युवक वर्ग उपस्थित होते