आधारपर्व फाऊंडेशन ला यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहिर
अजय टप
आधारपर्व फाउंडेशन तेल्हारा जिल्हा अकोला या मदत सेवाकारी फाउंडेशनच्या माध्यमातून गेली दोन वर्ष पासुन गरीब गरजु अपंग निराधार यांना मदतकार्य उपक्रम संपुर्ण अकोला,बुलडाणा जिल्ह्यात सातत्याने राबविले जातात मागिल वर्षी कोरोना सारख्या संकटाच्या वेळी प्रत्येक भागात लॉकडाऊनमुळे गोर गरीबांचे प्रचंड हाल झाले या अत्यंत गरजेच्या वेळी आधारपर्व सदस्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करिता कुठल्याही प्रकारची नकारात्तमता न बाळगता गरजु अपंग निराधार यांच्या पर्यंत प्रत्यक्ष जाऊन किराणा किट,थंडीच्या काळात रस्त्यावर बेघर असलेल्या रोडवर फिरणाऱ्यांना ब्लँकेट,पाल टाकून राहणाऱ्या परिवारातील मुलांना वही,पेन, ग्रामीण भागातील हुशार अभ्यासु गरजु मुलीला शिक्षणासाठी लागणारे पुस्तक, कॅन्सर ग्रस्त भगिनीला डॉक्टरांशी चर्चा करून आधार देणे या निःस्वार्थ कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, जया आलिमचंदानी फाऊंडेशन यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी आधारपर्व फाऊंडेशनची निवड करण्यात आली असुन या पुरस्काराचे वितरण मुंबई येथे १३ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे
पुरस्कार मिळाल्याचे जाहिर होताच आधारपर्व फाउंडेशनच्या सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.गेल्या दोन वर्षा पासुन गरजु अपंग निराधार यांच्या मदत कार्यसेवेची पावती म्हणून यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्राप्त होत असुन या पुरस्काराचे मानकरी सर्व सदस्य असून मदत कार्याचा वसा हाती घेऊन आमचे हे सेवा कार्य अहोरात्र अखंडित गरजुच्या सेवेत राहील असे अध्यक्षा श्रध्दा गढे यांनी कळविले.