बचतगट चळवळ क्रांती घडवेल- जयश्रीताई शेळके
![]() |
दिशा महिला बचतगट फेडरेशनच्या लालमाती शाखेचा थाटात शुभारंभ |
मोताळा : महिला बचतगटांचे सबलीकरण करण्याच्या उद्देशाने दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. ही एक आर्थिक चळवळ आहे. यामाध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील बंद पडलेले साडेतीनशे बचतगट पुन्हा सुरु करण्यात आले. तर ५७० नवीन बचतगट सुरु केले. बचतगट फेडरेशनच्या कामात महिलांचा मिळणारा भक्कम प्रतिसाद मला नव्या जोमाने कार्य करण्याची ऊर्जा देतो. येणाऱ्या काळात बचतगटांची चळवळ नक्कीच क्रांती घडवेल, असा विश्वास दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केला.
दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन तथा महिला अर्बन को-ऑप-क्रेडीट सोसायटीच्या लालमाती येथील शाखेचा शुभारंभ ७ नोव्हेंबर रोजी दुपारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन माजी उपजिल्हाधिकारी तथा अभिता कंपनीचे संस्थापक सीईओ सुनील शेळके यांच्या हस्ते झाले. पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, महिलांमध्ये अतिशय ताकद आहे. महिलांनी आपल्यातील अंगभूत गुण ओळखले पाहिजेत. महिलांमधील आंतरिक गुणांचा विकास करण्याचे काम दिशा बचतगट फेडरेशन करेल. आपणास महिलांच्या हातात बळ द्यायचे आहे. येणाऱ्या काळात बचतगटांच्या उत्पादनांचे मोठे प्रदर्शन मोताळा तालुक्यात भरवायचे आहे. दिशा बचतगट फेडरेशन महिलांच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणीत खंबीरपणे पाठीशी उभे राहील, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी बोलतांना सुनील शेळके म्हणाले की, आपल्याकडे किती पैसे आहेत, किती प्रॉपर्टी आहेत यावरुन आपली श्रीमंती ठरत नाही. तर कुटुंबात, समाजात वावरतांना आपण महिलांना कशा प्रकारची वागणूक देतो यावरुन आपली प्रगती मोजली जाणार आहे. महिलांमध्ये उद्योजक बनण्याची क्षमता आहे. येणाऱ्या काळात दिशा बचतगट फेडरेशनच्या माध्यमातून हजारो महिला उद्योजक निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डिसेंबर महिन्यामध्ये रोजगार मेळाव्यातून जिल्हयातील दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुखत्यारसिंग मोरे, पंचायत समितीचे मा. सभापती उत्तमराव वैराळकर, पान्हेरा ग्रामीणचे संस्थापक अध्यक्ष दशरथ तायडे, हभप शिवदास महाराज राहणे, धामणगाव बढेचे सरपंचपती आलीम कुरेशी, मा. प. स. उपसभापती रावसाहेब देशमुख, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, डॉ. शरद काळे, गणेशसिंग राजपूत यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, माजी सभापती उज्वलाताई चोपडे, माजी उपसभापती सुभाषसिंग मोरे, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा निताताई पाटील, डॉ. तेजल काळे, हभप गाळणे महाराज गुरुजी, कोऱ्हाळा बाजार सरपंच श्रीकृष्ण सोनोने, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जंगले पाटील, पान्हेरा सरपंच किरणताई काटकर, तपोवन-काळेगाव, पोखरी सरपंच लक्ष्मीताई पाटील, कुऱ्हा सरपंच वर्षाताई घोती, किन्होळा सरपंच पद्माबाई गवई, तपोवन माजी सरपंच सुनील पाटील , धा. बढे ग्रा.पं. सदस्य धनराज महाजन, हापीज सईद, माजी सरपंच दरबारसिंग मोरे, काँग्रेसचे युवानेते विशाल बावस्कर, पत्रकार विस्वासराव पाटील, गोतमारा- हनवतखेड सरपंच विनोद राठोड, डोंगरखंडाळा उपसरपंच श्याम पाटील सावळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर पाटील, मनोज वाघ, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन तथा दिशा महिला अर्बनच्या अध्यक्षा सविताताई डुकरे, उपाध्यक्ष चंद्रकला नारखेडे, संचालिका प्रियंका राठोड, स्नेहल नेवरे, शगुप्ता शाहीन काझी, सविता किटे, रजनी शेळके, सुरेखा एंडोले, सुनंदा जैन, बेबी पवार, राधाबाई हिवाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश महाजन यांनी केले. आभार नितीन उबाळे यांनी मानले.