Breaking News
recent

कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य मार्ग रस्त्याच्या धुळीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात -- पत्रकार सिध्दार्थ कांबळे

 


नांदेड प्रतिनिधी - वैभव घाटे

 कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य मार्गावरील  बाभळी (ध) गोदावरी पुलापर्यत रस्त्याचे काम अतिशय संथगतीने चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरील मुरूमाच्या धुळीने कुंडलवाडी शहरातील व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असुन व कुंडलवाडी शहर व परिसरातील शेतीच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात धुळ जमा होत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान होत असुन कुंडलवाडी ते धर्माबाद राज्य मार्ग रस्त्याचे काम चालू असताना संबंधित गुत्तेदारांकडुन साध्ये पाणी सुध्दा मारले जात नसल्यामुळे प्रवाशांच्या व वाहन चालकांच्या विशेष करून मोटारसायकल चालकांच्या डोळ्यात मोठ्या प्रमाणात मुरुमाची धुळ जात असल्या कारणाने डोळयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 

आणि मोटारसायकल चालवताना आपला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या मोठ्या गाड्यांची धुळ रोड लगत असल्या आजुबाजुच्या नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे याचा नाहक त्रास अनेकांना सहन करावा लागत आहे.  त्यामुळे या गंभीर समस्येकडे जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाचे कुंडलवाडी शहराध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

Powered by Blogger.